Monday, January 7, 2019

जास्त ताणू नका, लाईटली घ्या!
प्रत्येकांनी एकमेकाला
थोडं समजून घ्या;
खूप जास्त ताणू नका
सगळेच लाईटली घ्याll
थोडं फार मागे पुढे
होतच असतं;
शंभर टक्के perfect
कुणीच नसतंll
माणुसकीही सर्वांकडे
असलीच पाहिजे;
वागण्यातून नम्रता
दिसलीच पाहिजेll
छोट्या छोट्या गोष्टी वरून
कशाला करायचं बंड;
आपण गोड बोललंकी
समोरचा होतो थंडll
कधी कधी सारा विषय
फारच क्षुल्लक असतो;
माणूस मात्र विनाकारण
टेंन्शन मध्ये बसतोll
कसाही प्रसंग असला तरी
राहिलं पाहिजे शांत;
आपल्या सहनशीलतेचा
होऊ देऊने अंतll
घर असो , ऑफिस असो
वा असो Whats app;
भेटून घ्या , बोलून घ्या
पडू देऊ नका gapll
भाषा असली स्वीट
की सगळं होतं नीट;
कुणाचाच कुणाला
येत नाही वीटll
झालं गेलं विसरून जा
घ्या हातात हात;
निमित्ताने भेटलो आपण
द्या हासून साथll
हवा जेव्हा कटाक्ष हळवा..
निखार्यांची जीत झाली..
सहज सुंदर दानाचीही..
झोळीत येता भीक झाली..
कुठे प्रारब्ध मागत होते..
रोजची उजळणी
कुठे नशिबाच्या माथी..
वेदनांची मेजवानी आली..
काय त्यांचे ऋण मानावे..
कोरडे डोह जे भेटले
फुलांच्या ताटव्याला साऱ्या..वादळाची भेट झाली .
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
...
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."