Monday, January 7, 2019

जास्त ताणू नका, लाईटली घ्या!
प्रत्येकांनी एकमेकाला
थोडं समजून घ्या;
खूप जास्त ताणू नका
सगळेच लाईटली घ्याll
थोडं फार मागे पुढे
होतच असतं;
शंभर टक्के perfect
कुणीच नसतंll
माणुसकीही सर्वांकडे
असलीच पाहिजे;
वागण्यातून नम्रता
दिसलीच पाहिजेll
छोट्या छोट्या गोष्टी वरून
कशाला करायचं बंड;
आपण गोड बोललंकी
समोरचा होतो थंडll
कधी कधी सारा विषय
फारच क्षुल्लक असतो;
माणूस मात्र विनाकारण
टेंन्शन मध्ये बसतोll
कसाही प्रसंग असला तरी
राहिलं पाहिजे शांत;
आपल्या सहनशीलतेचा
होऊ देऊने अंतll
घर असो , ऑफिस असो
वा असो Whats app;
भेटून घ्या , बोलून घ्या
पडू देऊ नका gapll
भाषा असली स्वीट
की सगळं होतं नीट;
कुणाचाच कुणाला
येत नाही वीटll
झालं गेलं विसरून जा
घ्या हातात हात;
निमित्ताने भेटलो आपण
द्या हासून साथll
हवा जेव्हा कटाक्ष हळवा..
निखार्यांची जीत झाली..
सहज सुंदर दानाचीही..
झोळीत येता भीक झाली..
कुठे प्रारब्ध मागत होते..
रोजची उजळणी
कुठे नशिबाच्या माथी..
वेदनांची मेजवानी आली..
काय त्यांचे ऋण मानावे..
कोरडे डोह जे भेटले
फुलांच्या ताटव्याला साऱ्या..वादळाची भेट झाली .
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
...
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."  
एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?
.
.
.
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
.
.
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळू चालत होता...  
भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात... 90% मुली यामध्ये बिझी असतात...
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस....
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु.....
जानू आय लव यु... जीव घ्या आता त्या जानू
चा.......   

आठवण आली तुझी की

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...
पण तरिही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी...